Sunday, February 24, 2013

राजकारणाविषयी सर्वकाही

चला राजकारणात !

चला राजकारणात ! हे राजहंस प्रकाशनाने काढलेलं माझ तिसर पुस्तक बाजारात आलय. २७ फेब्रुवारीला मंत्रालयातील परिषद सभागृहात सायंकाळी ५ वाजता त्याचे प्रकाशन होत आहे. आर.आर. पाटील यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित होत असून कुमार केतकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
काय आहे या पुस्तकात?
राजकारणाशी सम्बंधित  सार काही, अस म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय काय? तर,
* चांगल्या माणसांनी राजकारणात का यावे?
* राजकारणात चांगल्या माणसाचा टिकाव लागतो का?
*  राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैसा हवाच का?
* राजकारणात जात कितपत आडवी येते?
* गुंड, मवाली, चारित्र्यहीन माणसाचाच राजकारणात टिकाव लागतो का?
* गोद्फादार असेल तरच राजकारण करावे हे म्हणणे खरे आहे का?
* चांगली माणसे  निवडून का येत नाहीत?
- या आणि असल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत. नुसती उत्तरेच नाहीत तर त्यांची उदाहरणेही आहेत. या शिवाय-
* राजकारणाच्या पाय-या कोणत्या?
* नेता कसा निवडावा?
* नेत्याशी कसे वागावे?
* पत्रकारांशी कसे वागावे? हे सोप्या शब्दात समजाऊन सांगितले आहे.
त्या बरोबरच --
*भारताची घटना काय आहे?
* भारतातील निवडणूक पद्धत, त्यातील दोष, वैशिष्ट्ये यांची चर्चा
*प्रमुख राजकीय पक्षांची घटना, धोरणे, सदस्यत्वाच्या अटी
*भारतीय लोकशाही अधिक निर्दोष होण्यासाठी काय केले पाहिजे? हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकाची पाने २१६ असून किंमत २०० रुपये आहे. सर्व शहरांत ते उपलब्ध आहे.