Monday, September 22, 2014



१९९५ च्या जवळ की पुढे?
संपादकांच्या नजरेतून
दीपक पटवे, िनवासी संपादक, दैनिक िदव्य मराठी, औरंगाबाद
गोपीनाथ मुंडे यांनी काढलेली संघर्षयात्रा, बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावाती दौरे, गो.रा. खैरनारांसारख्या अधिकाऱ्यांची पत्रकबाजी यामुळे १९९५ च्या िनवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतराचे वारे असेच वेगाने वाहू लागले होते. त्यामुळे १९९५ साली झालेल्या िनवडणुकीत मराठवाड्यात िशवसेनेचे १५ तर भाजपाचे १० उमेदवार िनवडून आले होते. या २५ आमदारांची, म्हणजेच मराठवाड्याची युतीचे सरकार स्थापायला त्यावेळी मोठीच मदत झाली होती. मागच्या िनवडणुकीत मात्र परििस्थती एकदम वेगळी होती. तब्बल ३२ जागा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आल्या आणि युतीला केवळ ०९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावेळी सत्तांतराचे वारे वाहात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीमेची जोड त्यांना िमळाली आहे. त्यामुळे यावेळी मराठवाड्यात िशवसेना-भाजपा आणि िमत्रपक्षांच्या महायुतीला िकती फायदा होतो, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच राजेश टोपे, राजेंद्र दर्डा, मधुकर चव्हाण, अब्दुल सत्तार, सुरेश धस, अमीत देशमुख या िवद्यमान मंत्र्यांची प्रतिष्ठाही याच प्रांतात पणाला लागली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि िशवाजीराव पाटील िनलंगेकर यांचेही राजकीय भवितव्य ही िनवडणूक ठरवणार आहे. अर्थात, िशवसेना-भाजपा आणि िमत्रपक्षांची युती होते की नाही, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र लढणार की स्वतंत्र या प्रश्नांची अजून उत्तरे िमळालेली नाहीत. त्यामुळे तर उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
मराठवाड्यातल्या नांदेड आणि औरंगाबाद या दोन िजल्ह्यात प्रत्येकी ९ मतदारसंघ आहेत.  लातूर आणि बीड िजल्ह्यात प्रत्येकी ६ तर जालना िजल्ह्यात ५ मतदारसंघ आहेत. परभणी, उस्मानाबाद आणि िहंगोली हे ितन्ही िजल्हे लहान आहेत. नांदेड, लातूर या दोन िजल्ह्यांत काॅंग्रेस आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेसचं वर्चस्व रािहलं आहे. या दोन िजल्ह्यांनी चार मुख्यमंत्री राज्याला िदले आहेत आणि ते चौघेही काॅग्रेसचेच होते हे त्या मागचे कारण आहे.  नांदेडकडून औरंगाबादकडे येताना िशवसेनेचं आणि काही प्रमाणात भाजपाचं वर्चस्व वाढत जाताना िदसतं. या िनवडणुकीतही ट्रेण्ड तसाच राहण्याची शक्यता आहे. मात्र १९९५ ची परिस्थिती पुन्हा येते की त्यापेक्षाही अधिक अनुकूल स्थिती महाआघाडीला िमळते हे आघाडी आणि जागा वाटपाच्या िनर्णयानंतरच कळणार आहे.
गेल्या िनवडणुकीनंतर मराठवाड्यातल्या िवलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांचं िनधन झालं.  त्यांच्या िशवाय होणारी ही पहिलीच िनवडणूक आहे. त्यामुळे त्यांची उणीव मराठवाड्याला तर भासणारच आहे, पण त्यांच्या कुटुंबीयांची परीक्षाही ही िनवडणूक घेणार आहे. त्या दृष्टीने देखील ही िनवडणूक वेगळी ठरेल.  मुंडे यांची कन्या पंकजा या मागच्या िनवडणुकीत बीड िजल्ह्यातल्या परळीतून ४३ हजार मतांच्या फरकाने िनवडून आल्या होत्या. यावेळी गोपीनाथरावांच्या िनधनामुळे तयार झालेली सहानुभूती आणि संघर्ष यात्रेला िमळालेला प्रतिसाद यामुळे त्यांचा िवजय आताच नक्की मानला जातो आहे. िवलासराव देशमुख यांचे िचरंजीव मंत्री अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघातून लढणार आहेत. कोणाचा फोनही न घेणे आणि जनसंपर्काचा अभाव यामुळे त्यांची परििस्थती मात्र कठीण आहे. चुका दुरूस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण ते निवडण्ूक आली म्हणून तसे वागताहेत हे मतदार ओळखून आहेत. त्यात भाजपाने ितथे शैलेष लाहोटी यांना उमेदवारी िदली तर मात्र अमित यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मोठीच मेहनत करावी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोकसभा िनवडणूकीत िनवडून आले आणि काॅंग्रेस पक्षात त्यांचं महत्व पुन्हा वाढलं. या िनवडणुकीत भोकर मतदारसंघातून ते यावेळी आपल्या पत्नीला, अनिता चव्हाण यांना िरंगणात उतरवत आहेत. तो मतदारसंघ परंपरागत चव्हाण कुटुंबीयांचाच असला तरी सौ. चव्हाणांच्या फटकळ स्वभावामुळे अशोक चव्हाणांची ही परीक्षाच ठरणार आहे. त्यातच भाजपाने डाॅ. माधवराव किन्हाळकर यांना उमेदवारी िदली तर अशोक चव्हाण त्याच मतदारसंघात अडकून पडतील अशी िस्थती आहे. तरीही अनिता चव्हाण यांना िनवडून आणणे त्यांच्यासाठी सुळावरची पोळी ठरली तरी आश्चर्य वाटायला नको. त्यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकरांना भाजपाने जवळ केले आहे. त्यांची भूिमकाही महत्वाची ठरणार आहे.
बीड िजल्ह्यात मागच्या िनवडणुकीत सहा पैकी ५ आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे िनवडून आले हाेते आणि केवळ एक भाजपाचा होता. यावेळी नेमकी उलट परिस्थिती असेल, असे िचत्र िदसू ल ागले आहे. पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस हे तर चक्क नगर िजल्ह्यातला मतदारसंघ शोधू लागले आहेत. भाजपातल्याच िदग्गजांना फोडून ितथे राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याची तयारीही चालवली जाते आहे. पराभवाची शक्यता लक्षात घेऊन ते एक तर उमेदवारीच टाळतील, अशीही शक्यता आहे.
उस्मानाबाद िजल्ह्यातल्या तुळजापूर मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी चाचपणी करून पािहली, अशी मािहती समोर आली होती. तो भाजपाकडे असलेला मतदारसंघ आहे. पण भाजपाची फारशी ताकद नसल्यामुळे मंत्री मधुकर चव्हाण ितथून सहज िनवडून येत रािहले आहेत. यावेळीही भाजपाकडे ितथे उेमदवार िदसत नाही. त्यामुळे मधुकरराव फारशा िचंतेत नाहीत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे जालना िजल्ह्यातून िनवडण्ूक लढतील. त्यांच्या मतदारसंघात िशवसेनेनेे माजी आमदार िवलास खरात यांना उमेदवारी िदली तर टोपे यांची मेहनत वाढणार आहे. अन्यथा, राजेश टोपे यांनाही फार धोका आहे असे वाटत नाही. औरंगाबाद शहरातल्या पूर्व मतदारसंघातून शालेय िशक्षणमंत्री राजेंद्र दर्डा िनवडणूक लढतील. त्यांनी पक्ष बाजूला ठेवून अच्छा आदमी म्हणत प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या मतदारसंघात भाजपाकडून िवशिष्ट उमेदवार िदला जावा, असा प्रयत्न त्यांच्याकडूनच केला जात असल्याचे भाजपाचे काही नेते सांगतात. तरीही अतुल सावे यांचे पारडे सध्या तरी उमेदवारीसाठी जड वाटते. त्यांना िशवसेनेची कशी मदत िमळते यावर दर्डा यांचे भवितव्य अवलंबून आहे. याच िजल्ह्यात काॅंग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार हे दुसऱ्यांना िसल्लोडमधून भवितव्य अजमावणार आहेत. मात्र, भाजपने ितथे केलेली तयारी आणि मोर्चाला िमळालेला प्रतिसाद पाहाता सत्तार यांना ही िनवडणूक जड जाईल अशी िचन्हे िदसू लागली आहेत.
पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे हे पंकजा िवरूद्ध अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता आहे. लातूर िजल्ह्यात िनलंगेकर कुटुंबामध्येच पुन्हा लढत  होणार आहे. बीड िजल्ह्यात पंिडत कुटुंबातली भाऊबंदकी अशीच उघडपणे समोर येईल. या परंपरागत कौटुंबीक भांडणातून जे आतापर्यंत समोर येत गेले तेच यावेळीही घडेल, अश्ीच िचन्हे आहेत. तरीही या लढती देखील माध्यमांना बातम्या आणि मतदारांना चर्चांचे िवषय पुरवत राहातील, यात शंका नाही.