Sunday, February 12, 2017

नियोजित कादंबरीचा मधला एक तुकडा पुन्हा तुमच्या अभिप्रायासाठी


लोणकर आंघोळ करून आले तोपर्यंत दीपक जाधवचा फोन येऊन गेला होता. त्यांनी लगेचच दीपकला काॅल लावला.
गुड माॅर्निंग सर. दीपक बोलतोय.
गुड माॅर्निंग. बोला.
सर, चेतनचा तपास लागला?
कोणी सांगितलं?
काही दैनिकात बातम्या आल्या आहेत तशा म्हणून विचारलं.
काय बातम्या आल्या आहेत?
चेतनचा ठावठिकाणा पोिलसांना लागला असून लवकरच पोिलस त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत, अशी मािहती नंदुरबार पोिलसांच्या हवाल्याने िदली आहे बहुतेक दैनिकांनी. दीपकने सांगितले.
नंदुरबार पोिलस? त्यांना कोणी सांगितलं की त्याला नंदुरबार जिल्ह्यात नेण्यात आलं आहे म्हणून? लोणकरांना प्रश्न पडला.
सर, आपल्या आॅफिसमधून माहिती लीक झाली आहे. तुम्ही नंदुरबारला गेला आहात, असंही एका दैनिकाने छापलंय सर.
अशी कशी माहिती लीक होते आॅफिसातून?लोणकरांच्या बोलण्यातून ते वैतागले आहेत हे स्पष्ट जाणवत होतं.
सर, पण काही आशा िदसताहेत का चेतनचा तपास लागण्याच्या? इकडे सगळे टेन्शनमध्ये आहेत. चेतनच्या आई-वडिलांना समजावणेही कठीण होत चालले आहे. शिवाय..
शिवाय काय?
हेच. इतर दैनिकाचे लोकं िफतवतात त्यांना. त्यामुळे आगीत तेल पडतं.
इतर दैनिकाचे काय, आपल्या दैनिकातलेही काही आहेत त्यात. मला समजलंय सगळं. लोणकरांच्या या विधानाने जाधवांना काहीसा धक्का बसला.
पण त्याच्या आई वडिलांना काही तरी सांगावं लागेल सर आज. म्हणून फोन लावला खरं तर. कारण आज आपण काहीच बातमी छापलेली नाही, याचंही भांडवल केलं जाईल तिथे. दीपक जाधव त्यांची चिंता व्यक्त करीत होते. त्यांना लगेचच चेतनच्या घरी जायचे होते.
होऊ द्या भांडवल.मी स्वत: लक्ष घालून आहे आणि सर्व यंत्रणा प्रामाणिकपणे शोध घेते आहे, एवढच त्यांना सांगा. लोणकर आपल्या भूमिकेवर ठाम होते.
ज्या अर्थी नंदुरबार पोिलसांच्या हवाल्याने बातमी छापली आहे त्या अर्थी ती नंदुरबार आवृत्तीलाही छापली असणार, असा त्यांचा होरा होता. कपडे करून ते खाली आले. अजय तयार होऊन बसला होता आणि वर येण्याच्याच तयारीत होता. त्यालाही त्यांनी सोबत घेतलं. आधी नास्ता केला आणि नंतर ते पेपर स्टाॅलवर गेले. तिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही याची त्यांना खात्री होती.उपलब्ध सर्वच दैनिके उचलून त्यांनी स्टाॅलवर पैसे िदले आणि लाॅजवर आले. अपेक्षेप्रमाणे काही दैनिकांनी नंदुरबार आवृत्तीत बातमी घेतली होती.
चेतनचा तपास लागला आहे. लवकरच आम्ही तो पोिलसांच्या संरक्षणात असेल. त्याला पळवून नेणाऱ्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले असेल असा आम्हाला विश्वास आहे. असे सांगणारा नंदुरबार एसपींचा कोट एका दैनिकाने छापला होता.ही भाषा तर मराठे यांची पहिल्या दिवशीही होती. त्यावरून दैनिकांनी तारे तोडलेले होते हे लोणकरांच्या लक्षात आले. इतर स्थानिक बातम्या वाचण्यात लोणकरांना काहीही रस नव्हता. त्यांनी सर्व पेपर्स गोळा करून तो गठ्ठा टेबलवर ठेवला.
शिरीषने केलेल्या अपघाताविषयी काही तपशील उपलब्ध होतो का, या विषयी त्यांना कमालीची उत्सुकता होती.त्या संदर्भात दीपक जाधवांना माहिती काढायला सांगायचे राहून गेले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दीपकला फोन लावला.
दीपक बोलतोय सर फोन घेत दीपक जाधव म्हणाले.
दीपक, अहो तो आमदार शेट्येला अपघात करणारा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे ना?
हो सर. अटक केली आहे पोिलसांनी त्याला.
नेमका कसा पकडला गेला तो? पळून जात होता ना तो?
असं पोलिस म्हणताहेत. पण आपल्या माहितीनुसार तोच पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
अच्छा. मग तो जखमी कसा झाला? त्याच्या डोक्याला लागल्याचं टीव्हीवर पाहिलं मी. लोणकर सावधपणे बोलत होते.
ते नाही माहिती सर. पण तो ट्रक तिथे कोणीच नसताना जमावाने जाळला, असं कसं झालं, हा प्रश्न मला पडला आहे. आमदाराच्या कार्यकर्त्यांना आणि पोिलसांनाही कळायच्या आधीच ट्रक पेटला होता, असं तिथे आधी पोहोचलेल्यांचं म्हणणं आहे. ते एक कोडंच आहे. बहुतेक ट्रकमध्ये काही ज्वलनशील पदार्थ असावेत, असा संशय आहे मला. दीपक चांगले रिपोर्टर आहेत, असे लोणकरांचे मत झाले.
आणखी काय माहिती मिळतेय त्या ट्रक चालकाबद्दल? लोणकरांनी विचारलं खरं; पण आपण जरा जास्तच उत्सुकता दाखवत आहोत त्या ट्रकचालकाबद्दल, असा संशय तर दीपक जाधवला येणार नाही ना, अशी शंकाही त्यांना आली. त्यामुळे लगेचच त्यांनी पुष्टी जोडण्याचा प्रयत्न केला. काय आहे दीपक, या घटनांच्या मािलकेतला कोणताही दुवा आपल्याला चेतनपर्यंत पाेहोचवू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आपण फारच चौकस राहिलं पािहजे. नाही का?
हाे सर. दीपक म्हणाले. मी आणि सुहासने बऱ्यापैकी माहिती गोळा केली आहे
सुहास कोण?
आपला िरपोर्टर आहे सर. चेतनच्या सुटीच्या दिवशी हाच क्राईम रिपोर्टींग करतो आपल्याकडे.
अच्छा अच्छा. तो? लोणकरांना हाॅटेलमध्ये सावंत बरोबर बसून आपल्याला सावध करणारा हाच मुलगा आहे, याची आठवण झाली. काय माहिती मिळाली आणखी ?
सर, या ट्रक चालकाकडे लायसन्सही नाही ट्रक चालवण्याचे. त्याच्याकडे स्वत:ची ओखळ देणारा काहीही पुरावा आढळला नाही. त्याची बॅग ट्रकमध्येच जळून गेली, असं तो पोिलसांना सांगतोय.
ट्रक कुठून चोरला त्याने?
मुंबईतून चोरला होता, असं तो म्हणतोय. सांताक्रूझच्या झोपडपट्टीत तो राहातो. एका झोपडपट्टी दादाला पैसे द्यायचे होते. म्हणून ट्रक चोरला होता. तो ट्रक आपल्या भागात कुठे तरी भंगारवाला आहे चोरीचे ट्रक डिसमेंटल करून विकणारा, त्याला तो हा ट्रक विकणार होता, असंही सांगतोय.
ज्याचा ट्रक चोरला त्याने काही चोरीची िफर्याद िदली असेल ना? लोणकरांना उत्स्तुकता होती शिरीषचा प्लान समजून घेण्याची.
हो सर. िरकामा ट्रक चोरीस गेल्याची फिर्यात सानपाडा पोलिस ठाण्यात दाखल आहे.
बऱ्यापैकी माहिती काढलीत तुम्ही. लोणकारांनी समाधान व्यक्त केलं.
थॅक्यू सर. आणखी काही मािहती मिळाली तर कळवतो. दीपक जाधव म्हणाले. लोणकरांचा िनरोप घेऊन त्यांनी फोन कट केला.

शिरीषचा हा काही तरी वेगळा प्लान असावा, अशी दाट शंका लोणकरांना येत होती. कारण दीपक म्हणतो त्याप्रमाणे अपघात केल्यानंतर तिथे काेणीही नसताना त्याला तिथून पळून जाणे सहज शक्य होते. पळून गेला असता तरी आमदाराला रोखण्याचे काम फत्ते झालेच होते. तरीही त्याने ट्रक जाळला आणि स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. याचा अर्थ त्याला पोिलसांच्या सहवासात राहायचं आहे. त्यांच्याकडून काही तरी माहिती मिळवण्याचा त्याचा प्लान िदसतो. अर्थात, काहीही असला तरी आता तो आपल्याशी संपर्क साधू शकणार नाही आणि त्यामुळे त्याने काहीही मािहती िमळवली तरी त्याचा आपल्याला थांग लागणार नाही, या जाणीवेने लोणकरांची अस्वस्थता वाढवली. पोलिस ठाण्यात जाऊन त्याला भेटायला हवे. िकंवा न्यायालयाच्या आवारात भेटण्याचा प्रयत्न करायला हवा, अशा विचारापर्यंत ते आले. त्यासाठी त्यांना तातडीने परत िफरायला हवे होते. त्यासाठी दुपारी इन्स्पेक्टर गावीतांना फोन लावून अंदाज घ्यायचा असा िनर्णय त्यांनी घेतला.