Sunday, November 16, 2014



एमआयएमचे ओवेसी आणि भाजपचे नरेंद्र मोदी

सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद मध्य आणि मुंबईतील भायखळा िवधानसभा मतदारसंघातून िनवडून आलेल्या एमआयएमच्या, अर्थात, मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाच्या उमेदवारांची महाराष्ट्राच्या राजकारणात मोठीच चर्चा आहे. या पक्षाच्या महाराष्ट्रातील आगमनामुळे आता महाराष्ट्रात अराजक येणार आहे इथपासून तर या पक्षाला रोखण्यासाठी सर्व िहंदूत्ववादी संघटनांनी एकत्र आले पािहजे इथपर्यंत चर्चा सुरू अाहेत. कारण एमआयएमचे हैदराबादेतील आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी १५ िमनीटांसाठी पोिलस हटवा आणि पहा २५ कोटी मुसलमान काय करू शकतात ते, असे भडक आणि गंभीर िवधान जाहीर सभेत केले होते. जुन्या हैदराबाद राज्यातील रझाकारांचा जन्मदाता रझवी याने स्थापन केलेला हा पक्ष असल्यामुळे रझाकारांचीच मनोवृत्ती या पक्षाच्या प्रमुखांची आहे, असेही म्हटले जाते. त्याची शहनिशा करण्याची आणि भविष्य वर्तवण्याची ही जागा नाही. अचानक हा पक्ष महाराष्ट्रात दोन आमदार िनवडून आणतो आणि १४ जागांवर काट्याची लढत देतो, यामागचे गुपीत आपण जाणून घेतले पाहिजे, असे मला वाटते.
या िनवडणुकीत मुस्लीम मतदार ज्या प्रमाणात एमआयएमकडे आकर्षित झाला, ते महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मुस्लीम नेत्यांनाही धक्का देणारे आहे. िवशेषत: काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील मुस्लीम नेते या िनकालांनी हादरले आहेत. कारण मुस्लीमांची मते काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसशिवाय कुठेच जाणार नाहीत, अशी त्यांची आतापर्यंतची धारणा होती आणि ितला या िनकालांनी हादरा दिला आहे. समाजवादी पक्षाची अवस्थाही या दाेन पक्षांपेक्षा काही फार वेगळी नाही. याचं कारण मुस्लीम मतदार िहंदूत्ववादी पक्षांना मतदान करणार नाही अशी त्यांना खात्री होती. िहंदूत्ववादी पक्षांना नाही करणार तर जाणार कुठे? अशा भ्रमात हे ितन्ही पक्ष राहीले आणि एमआयएमने संधी साधली. या पक्षाने भडक भाषणं देऊन मुस्लीमांतील तरूण मुलांना आकर्षित केलं आणि म्हणून त्यांना इतकी मतं िमळालीत, असा समज काही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही बाब पूर्णसत्य मुळीच नाही. त्याहीपेक्षा वस्तुस्थिती फार वेगळी आहे आणि ती राजकारण समजून घेऊ इच्छीणाऱ्यांनी अवश्य जाणून घेतली पािहजे.
भडक भाषण देऊन एमआयएमने इतकी मते घेतली असतील तर तशीच भाषणं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाला कधीच का नाहीत इतकी मतं िमळू शकली? या प्रश्नाचे उत्तर हा युक्तिवाद करणाऱ्यांना द्यावे लागेल. याचा अर्थ एमआयएमचे नेते भडक भाषण करीत नाहीत, असा होत नाही. अामदार अकबरोद्दीन आेवेसींच्या अशा भाषणाचा उल्लेख वर आलेलाच आहे. तरीही मुस्लीम मतदार त्यांच्या तसल्या भाषणांनी त्यांच्याकडे आकर्षित झाला असेल हे मला पटत नाही.  खासदार असदोद्दीन ओवेसी यांची िवधानसभा िनवडणुकीच्या वेळची औरंगाबादेतील भाषणं पािहली तर त्यात एकही शब्द त्यांनी िहंदूंच्या िवरोधात काढलेला नाही.  १० टक्के पेक्षाही कमी वेळ त्यांनी िशवसेना आणि भाजपवर बोलण्यात घालवला आणि ६० ते ६५ टक्के वेळ काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसवर िटका करण्यासाठी िदला. २५ ते ३० टक्के वेळ त्यांनी एमआयएमची कार्यपद्धती समजवूून सांगण्यासाठी िदला, हे त्यांच्या भाषणांचं वैशिष्ट्य होतं. एमआयएमतर्फे हैदराबाद शहरात रोज जनता दरबार घेतला जातो आणि ितथे येणाऱ्या तक्रारींचा लगेच िनपटारा केला जातो, हे ते आवजुर्न सांगत होते. पक्षाने हैदराबाद शहरात उभे केलेल्या सामाजिक कार्याची मािहती देत होते. भडक भाषणांच्या आधारे एमआयएमने मते घेतलीत असे म्हणणाऱ्या िकती जणांनी त्यांचा हा  प्रचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल, यािवषयी शंकाच आहे.
एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी पक्ष वाढीसाठी जे काही िनयोजनबद्ध काम चालवले आहे ते आजच्या राजकीय परिस्थितीत नीट समजून घेतले पािहजे. अनेकांना आवडणार नाही आणि काहींना धक्काही बसेल; पण  ओवेसी यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर नजर टाकली तर भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि आेवेसी यांच्या िनवडणूक िनयोजनात अनेक साम्यस्थळे आहेत हे मला सांगितलेच पािहजे. ही या दोन नेत्यांची तुलना नाही आणि एमआयएम अथवा त्यांच्या नेत्यांचे उदात्तीकरणही नक्कीच नाही.  राजकारणातील यशाचा एक हमखास मार्ग तयार होत असल्याकडे हा अंगुलीनिर्देश आहे. यशाचा एक राजमार्गच मोदींनी देशातील राजकारणाला िदला आहे. त्याच मार्गाने ओवेसीही प्रवास करीत आहेत, आणि तेही मोदींइतके नसले तरी यशस्वी होत आहेत , हे आपल्याला िदसतेच आहे. म्हणूनच या मार्गाचा अभ्यास करण्याची, तो समजून घेण्याची आवश्यकता आहे.  त्यासाठी या पक्षाच्या कार्यपद्धतीकडे, मतदारांना आकर्षित करण्याच्या शैलीकडे आपण लक्ष ठेवलेच पािहजे. काय आहेत मोदी आणि ओवेसी यांच्या कार्यपद्धतीतील साम्य स्थळे? यावर आपण पुढच्या भागात सविस्तर प्रकाश टाकू.