२०१९ च्या निवडणुकीसाठीची नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली
सभा झाली ती वर्धात. त्या सभेत मोदींनी काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्या विषयी चकार
शब्दही काढला नाही. ते बाेलले शरद पवारांविषयी. याचा अर्थ त्यांना काँंग्रेसला दुर्लक्षून
मारायचे होते, काँग्रेस लढतीतच नाही असा संदेश द्यायचा होता असे विश्लेषण करण्यात येते
आहे.
वस्तुस्थिती काय आहे, हे जरा तपासून पाहू.
यंदाच्या निवडणुकीत
मोदींना बहुमत नाही मिळाले तर कोणाला मिळण्याची शक्यता आहे? कदाचित कोणालाच नाही. पण
अशा अवस्थेत भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष कोणता असू शकतो? डीएमके? माकप? भाकप? मायावतींचा
बसप? सपा? तृणमुल काँग्रेस की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस? अर्थात, यापैकी
कोणीही नाही. कारण यापैकी कोणत्याही पक्षाकडून देशातल्या सर्व राज्यात निवडणूक लढवली
जाण्याची शक्यात नाही. सर्व राज्यात निवडणूक् लढवू शकणारा भाजप नंतरचा एकमेव पक्ष आहे
काँग्रेस. असे असताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसकडे दुर्लक्ष करून त्या पक्षाला मारायचे
ठरवले तरी तो मरणार आहे का? आणि समजा ती शक्यता असती तर मोदींनी महाराष्ट्र वगळता अन्यत्रही
काँग्रेस संदर्भात तेच धोरण ठेवले असते. पण तसे ते करीत नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर
होणाऱ्या सभांमध्ये त्यांनी काँग्रेस अाणि राहूल गांधी यांच्यावर सडकून टीका केलेली
आहेच. मग ते महाराष्ट्रातच काँग्रेस विषयी का नसतील बोलले?

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती त्यासाठी लक्षात घ्यावी लागेल.
मागच्या म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दोन
तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळाला. त्यामुळेच गुजराथ, राजस्थान या
राज्यांप्रमाणे आपले संपूर्ण राज्य भाजपमय होण्याऐवजी सहा जागा विरोधी पक्षांकडे गेल्या
आणि भाजप ४२ जागांपुरता मर्यादित राहिला. खरे तर त्याच वेळी राज्यात संदेश गेला होता
की, इथे भाजपविरोधात त्यातल्या त्यात कोण ताकदवान असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आहे,
काँॅग्रेस नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर तसाही काँग्रेस पक्ष इथे मरणप्रायच आहे.
समजा यावेळी मोदी सरकार विरोधात अॅण्टी इन्कम्बन्सी असेल आणि मागच्या वेळच्या तुलनेत
विरोधी पक्षांच्या जागा वाढणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अधिक वाढण्याची
शक्यता जास्त आहे. त्यामुळे जो अधिक बलवान शत्रू, त्याच्यावर लक्ष केंद्रीत करायचे,
अशी ही स्टॅटीजी असू शकते. आपण देशभरातील मोदी विरोधकांना एकत्र करण्यात पुढाकार घेतला
म्हणून मोदींनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली, असे शरद पवार म्हणत असले तरी वास्तव महाराष्ट्रापुरते
मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. समजा शिवसेना-भाजप युती झाली नसती तर मोदींनी
टीका कोणावर केली असती? अर्थातच, शिवसेनेवर. मग त्यांनी भाषणात अप्रत्यक्षपणेही शरद
पवार यांचा उल्लेख केला नसता हे नक्की. जसे तामीळनाडूत गेल्यानंतर ते डाव्यांच्या वक्तव्यांकडे
लक्ष देण्याऐवजी आक्रमण करतात ते ममता बॅनर्जींवर.
राजकीय
फंडा
: शत्रुशी लढताना त्याला मदत करणाऱ्या राजांना, देशांना एकेकटे गाठून नामोहरम केले तर मुख्य शत्रुची ताकद आपोआपच कमी होते आणि त्याच्यावर युद्धात मात करणे सोपे जाते.
No comments:
Post a Comment